मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (वय 88 वर्षे) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरु होते. 100 पेक्षा जास्त नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. तर 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. Veteran actor Jayant Savarkar passed away drama film Marathi ते 97 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते. अनेक टीव्ही मालिकांमध्ये जयंत सावरकर झळकले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती.
जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.
वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ही माहिती जयंत सावकर यांचा मुलगा कौस्तुभ सावकर यांनी दिली. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांस भावपूर्ण श्रद्धांजली! #JayantSawarkar #Zeemarathi pic.twitter.com/6elUM6Rcat
— Zee Marathi (@zeemarathi) July 24, 2023
आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट या तीनही माध्यमांतून सावरकर घरोघरी पोचले. सुरुवातीची अनेक वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. तसेच, अभिनयाच्या प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी लहानसहान कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही.
जयंत सावरकर यांच्या लोकप्रिय भूमिकांविषयी सांगायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. याबरोबरच ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली ज्योतिषाची भूमिकाही विशेष गाजली होती. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी अनेक मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. इतकेच नव्हे तर आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर आपल्या अभिनयाची जादू दाखवता आली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.
¤ जयंत सावरकर यांना मिळालेले पुरस्कार
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले.
अभिनेते जयंत सावरकर यांचे आज (वय-88) निधन झाले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
★ अ. भा. म. ना. परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
★ रत्नागिरीतील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव
★ विष्णूदास भावे पुरस्कार
★ केशवराव दाते पुरस्कार
★ मास्टर नरेश पुरस्कार
★ महाराष्ट्र सरकारतर्फे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार