पुणे : पोलिसाने आज पहाटे केलेल्या गोळीबाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. भरत गायकवाड यांनी पत्नी मोनी व पुतण्या दीपक यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्यांनी स्वतःलाही संपवले. Excitement in the police force; Policeman commits suicide by killing his wife and nephew Pune Amravati suicide note भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त होते. ते पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन परिसरात राहत होते. सुट्टीवर ते पुण्यात आले होते. कोणत्या कारणाने ही घटना घडली, याची माहिती समोर आली नाही. सुसाइड नोटही सापडली नाही.
पुणे शहरात आज सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत:चा शेवट केला. एका सुखी कुटुंबाचा काही क्षणात शेवट झाला. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना चौकशीनंतर मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली.
पोलीस दलातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस दलात असणारा तणतणाव की कौटुंबिक कलह? असे कोणते कारण या घटनेमागे आहे, याचा शोध पोलिस शोध घेत आहेत. भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांची हत्या झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब पुणे शहरात वास्तव्यास आहे. सोमावारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44) ही भरत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड (वय 35) हा त्यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे 3.30 च्या सुमारास एसीपीने प्रथम पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर गोळीचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यांनी दरवाजा उघडताच एसीपीने त्यांच्या भाच्यावर गोळीबार केला, त्याच्या छातीत गोळी लागली. त्यानंतर गायकवाड यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.
यादरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून आणि त्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.