मोहोळ : लघुशंकेसाठी थांबलेल्या सेवानिवृत्त सैनिकाच्या मोटारसायकलची तीन लाख रु रक्कम असलेली पैशाची पिशवी घेऊन मोटरसायकलवरील दोन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना मोहोळ शहरापासून काही अंतरावर घडली. A retired soldier, who stopped for a small check, ran away with a bag full of money in broad daylight
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाफळे गावातील गोपीनाथ भानुदास दाडे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथील कुरुल रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या खात्यातून घर बांधण्याच्या कामासाठी पैसे काढण्यासाठी त्यांच्या एम एच १३ ए वाय ६६९७ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून वाफळे येथून मोहोळ येथे आले होते.
स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढून ते आपल्या वाफळे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. बँकेतून काढलेली तीन लाख रुपयाची रक्कम त्यांनी आपल्या पिशवीमध्ये ठेवून पिशवी मोटरसायकलच्या हँडलला अडकवली होती. दुपारी ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना सोलापूर पुणे रोडवर भारत पेट्रोल पंपावर त्यांनी दीड वाजणे दरम्यान पेट्रोल भरले व पंपाच्या पुढे बाहेर जाऊन लघवी करण्याकरिता मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली.
गाडीवरून उतरताच तेवढ्यात अचानक पाठीमागून मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम त्यांच्या मोटरसायकल जवळ येवून थांबले पाठीमागे बसलेल्या हिरव्या रंगाचा चौकडा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांच्या मोटरसायकल जवळ गेला व अडकवलेली पैशाची पिशवी काढून घेऊन मोटरसायकल वरून नरखेड रोडच्या दिशेने निघून गेला. याबाबत गोपीनाथ दाडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. यावरून त्या अनोळखी दोन चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 तरुणीवर दुष्कर्म; एकावर गुन्हा दाखल
सोलापूर : दवाखान्यात गेलेल्या महिलेला घरी सोडतो असे सांगून रिक्षातून हॉटेलमध्ये नेऊन दुष्कर्म केल्याबद्दल एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत 24 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मन्यम व्यंकटय्या रामगल (वय 52, रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे कर्नाटक येथील एक कुटुंबीय मड्डी वस्ती भागात राहण्यास आहे. पीडित महिलेची बहीण देखील त्याच परिसरात राहते. तिच्या शेजारी त्यांचा लांबचा नातेवाईक मन्यम हाही राहतो. पीडित तरुणी आपल्या वहिनी सोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळी त्यांना मन्यम याने पाहिले होते. दवाखान्यात तो पीडितेजवळ गेला व तिला तू येथे कशाला आली आहेस, चल मी तुला घरी सोडतो, असे सांगून त्याने तिला रिक्षामध्ये बसवून एका मित्राकडे नेले.
तेथून त्याने तिला एका लक्ष्मी मंदिरात नेऊन तिच्या गळ्यात एक पिवळा दोरा बांधला. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिला कोणत्याही नातेवाईकांना फोन लावू दिला नाही. त्याने पुन्हा त्या महिलेला कोर्टाजवळील एका ऑफिसमध्ये नेऊन तिचा फोटो लावलेल्या एका कागदावर धमकावून सह्या करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने आता आपण दोघे पती-पत्नी झालो आहे, असे सांगून तिच्यावर हॉटेलमध्ये दुष्कर्म केले तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित महिलेच्या भावाने पोलिसात पीडिता हरवल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस तिचा शोध घेत त्या हॉटेलवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मन्यम याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.
○ चोराने स्वागत नगरातून दुचाकीची पळवली
सोलापूर : स्वागत नगर येथील कटिंग सलून दुकानाजवळ लावलेली दुचाकी (एमएच १३, बीएफ २७२९) चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी लक्ष्मण खंडू कोरे (रा. मल्लिकार्जुन नगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. ३१ मे रोजी रात्री साडेआठ ते अकराच्या सुमारास चोरट्याने दुचाकी चोरल्याचे कोरे यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार उबाळे तपास करीत आहेत.