सोलापूर : एकाच्या विरोधात आमची तक्रार आहे. ती नोंदवून घ्या, असे म्हणून स्वतःच्या डाव्या हातावर ब्लेडने मारून जखमी करून घेतले. A policeman was punched in the chest for registering a complaint; Solapur threatened by spinning sattur in the air हातातील सतुर हवेत फिरवून पोलिसाला धमकावले, कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या छातीत ठोसा मारून खाली पाडले. या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावर प्रकरणी दोघांच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी हे कर्तव्यावर असताना, आरोपी मुकेश किसनसिंग बोधीवाले व त्याचा भाऊ गंगाराम किसनसिंग बोधीवाले (दोघे.रा.लष्कर,सोलापूर) हे आले व त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन अमर माने हा पोलिसाचा बातमीदार आहे. त्याच्या विरोधात आमची तक्रार घ्या असे म्हणून त्यांनी ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार करून जखमी करून घेतले.
सतुरच्या पाठीमागील मुठी ने स्वतःस दुखापत करून घेतली. पोलीस नाईक सरतापे यांच्या छातीत जोरात ठोसा मारून त्यांना खाली पाडले. टेबलावरील शासकीय कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांनी नोंदवली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला हे करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● तु हमारे बारे मे पोलिसाको खबरे देता क्या म्हणत कोयत्याने केला हल्ला ; दोघांवर गुन्हा
सोलापूर : तू पोलीस का खबरी है,तु हमारे बारे मे पोलिसाको खबर देता है क्या. तुझे अब खलास करते है असे म्हणत घरात घुसून एकास कोयत्याने वार करून जखमी केल्याबद्दल दोघां भांवाच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी अमर अशोक माने (वय-५० रा.सिद्धार्थ नगर,सोलापूर) व त्यांचे भाऊ नितीन हे दोघे घरी असताना अचानकपणे आरोपी मुकेश उर्फ मुक्या किसन सिंग बोधिवाले, गंगाराम उर्फ गंग्या किसनसिंग बोधिवाले (रा.दोघे नळ बजार चौक,लष्कर,सोलापूर) हे फिर्यादीच्या घरात घुसून त्यांनी फिर्यादीच्या मानेवर हातातील कोयत्याने वार केला. पण तो खांद्याला लागला.
दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या पोटावर वार केला. त्यात फिर्यादी गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. भाऊ नितीन यांनी आरडाओरडा केली तेव्हा तू बीच मे आया तो,तुझे भी खलास करेंगे अशी दोघांनी धमकी दिली. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी घरातील सामानाची फेकाफेकी करून तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी हा जीव वाचवण्याकरता घराबाहेर आला असता,त्याच्या मागे दोघे संशयित आरोपी कोयता घेऊन पळू लागले.
गल्लीतील लोक सोडवण्यासाठी येत असताना दोघांनी दगडफेक केली. या दगडफेकीत फिर्यादीच्या तोंडास व अंगास मार लागला. लोकांची गर्दी होताच दोघा आरोपीने पळ काढला, अशा आशयाची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. फिर्यादी माने यांच्या तक्रारीवरून मुकेश बोधीवाले व गंगाराम बोधीवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक धायतोडे हे करत आहेत.