सोलापूर : टोमॅटोच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी 40 पैसे प्रतिकिलो दराने मागितले. Due to the price of tomatoes, the farmer’s way to Solapur is blocked, the time for farmers to commit suicide has increased.
शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.
लागवडीपासून आजपर्यंत झालेला लाखो रुपयांचा खर्च वेगळाच. अशातच २५ किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला दहा रुपये दराने व्यापाऱ्यांनी मागितल्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने सर्व टोमॅटो महामार्गावर फेकून दिले. संतप्त शेतकऱ्याच्या या आंदोलनास अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त करत टोमॅटो दराबाबत रोष व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून, रात्रंदिवस राबूनही श्रमाची किंमत होत नसल्याची उद्विग्नता या तरुण शेतकऱ्याच्या या अचानक झालेल्या आंदोलनात दिसून आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 टोमँटोने आणली शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ
¤ टोमँटो आयात करणारे पंतप्रधान मोदी टोमँटो निर्यात करणार का….? मोदी सरकार बळीराजाचे की नौकरदाराचे ?
मंगळवेढा : खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर ढासळले असून २ ते ३ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे. बाजारपेठेतील घसरलेल्या दरामुळे शेतकरी शेतातील टोमॅटोही काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतात व बाजारपेठेत लाल चिखल निर्माण होत आहे.
टोमॅटोचे उत्पन्न थेट सपाट जमिनीवर न घेता बेड तयार करून मल्चिंग पेपरवर घेतले जात आहे व त्यास दोरी व काठीच्या साह्याने बांधीव उत्पादन घेतल्याने दर्जेदार टोमॅटो उत्पादन तयार होते. त्यामुळे या टोमॅटोला मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली,उत्तरप्रदेश, दक्षिण भारतासह परदेशातही मागणी मोठी असते.
सतत ढगाळ वातावरण व मध्यंतरी झालेला पाऊस तसेच थंडीची तीव्रता कमी झाल्याने लागवड वाढली आहे. एका महिन्यापूर्वी टोमॅटोच्या किमती या गगनाला भिडल्या होत्या. अनेक ग्राहकांनी तर टोमॅटो खरेदी करणे बंद केले होते. त्यामुळे मोदी सरकारने परदेशातून टोमँटो आयात केला होता. पण आता टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, बाजारपेठेत टोमँटोची आवक वाढली आहे. त्यामुळे व्यापारी टोमँटोकडे पाठ करीत आहेत. त्यामुळे टोमँटो ऊत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तीन महिन्यात टोमँटोची करावी लागणारी तोडणी दररोज आभाळ येत असल्यामुळे एकाच महिन्यात करावी लागत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेत झाल्यामुळे आवक अनेक पटीने वाढली आहे. त्याचा परिणाम मार्केटवर झाल्यामुळे दर कोसळले आहेत. तोडणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमँटोची तोडणी बंद केली आहे.
टोमँटो प्लॉट सांभाळण्यासाठी फवारणी करावी लागते परंतू त्याचा खर्च आता परवडत नाही. बाजारात मागणी घटली आणि आवक वाढली आहे. बाजार सुधारण्यास काही कालावधी लागेल असे व्यापारी सांगत आहेत. दर सुधारतील पण शेतकरी ऊद्वस्त झाल्यावर. शासन जागे होईल व टोमँटो निर्यात करेल शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.