सोलापूर : कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. Zika virus outbreak in Pandharpur on the eve of Ain Kartiki Ekadashi Health Department देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर आता पंढरपुरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तिला झिंका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. येत्या दि. २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे.
यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणेनंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात, तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणे आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. झिका व्हायरसची लक्षण कोणती? ताप येणे, डोकेदुखी आणि मळमळणे अशी झिका आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून येतात. प्रामुख्याने डासांमार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूळ फवारणी सुरू केली आहे.
मुंबईवरून एक महिन्यापूर्वी आलेल्या डॉक्टरला पंढरपूरमध्ये पोहचल्यावर त्रास जाणवू लागल्याने पुणे येथे जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. लागण मुंबईत झाली आणि उपचार त्यांची तब्येत आता चांगली सगळीकडे तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकही झिका व्हायरस रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे यात्रेच्या तोंडावर काहीतरी करून येणाऱ्या लाखो भाविकांनी घाबरवण्यात अर्थ नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
येत्या दि. २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकं दुखी आणि मळमळणे अशी झिका आजाराची लक्षणं दिसून येतात.
○ आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूळ फवारणी सुरू केली. या शिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. बाधीत परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून चार जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.
○ मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले…
आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात आला आहे. कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबर रोजी आहे. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही वयाची सूचना प्रशासनाला दिल्या. ज्या ठिकाणी दर्शन रांगेजवळ मठ असल्याने तेथून वारकरी जी घुसखोरी करतात त्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.