मुंबई : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. Activists of Thackeray group and Shinde group clashed on Shivtirtha, accused of using rods तर दुसरीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु येथे परिस्थिती बिघडत गेली. दरम्यान, दोनही गटाचे कार्यकर्त्यानी धक्काबुक्की केली .
मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री साडेआठ वाजता शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केलं. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील स्मृतीस्थळावर हजर होते. त्यामुळं ठाकरे गटानं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. अचानक दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन गटात शिवाजी पार्कवर जोरदार वाद झाला. दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करत एकामेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. मात्र, अचानक उडालेल्या गोंधळामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना देखील घडली आहे.
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. त्याआधीच दादरच्या शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर यांनी गंभीर आरोप केला आहे. आम्हाला मारण्यासाठी रॉड काढण्यात आल्याचे ते म्हणाले. महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे शीतल म्हात्रे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायला हवे. छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृति स्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही. त्याप्रमाणे शिवतीर्थावर स्मृती स्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल. शिवसैनिक एका निष्ठेने भिडणारच, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको, म्हणून समंजसपणाची भूमिका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात, त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती, पण बाळासाहेबांना आपण गमावलंय, या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार सोडून महिलांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार येथे घडला आहे. ही जागा कोणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत शिंदे गटानं म्हटलंय. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची ज्योत सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांच्या दलालांकडून ती भिजवण्याचा प्रयत्न होतो, अशी टीका आमदार सदा सरवणकर यांनी केली. स्मृतीस्थळाचे पावित्र्य यांनी घालवलं असून लाज वाटत असल्याचं शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय.