वृत्तसंस्था : वर्ल्डकपमध्ये आज होत असलेल्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. त्याने 106 चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराट वनडेमध्ये सर्वात जास्त शतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराटचे हे वनडेतील 50 वे शतक आहे.. दरम्यान, सचिन तेंडुलकरने वनडेत 49 शतके ठोकली आहेत. Virat Kohli breaks Sachin Tendulkar’s record, comes Sachin’s reaction
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड आमने सामने आले आहेत. या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. विराट कोहलीने आतापर्यंत 674 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने 673 धावा केल्या होत्या. तर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट तिसऱ्या स्थानी आला असून रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला गेला. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड मोडला. यानंतर सचिनने म्हटले, ‘जेव्हा मी तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये भेटलो, तेव्हा तू माझ्या पायांना स्पर्श केला आणि सर्वांनी मजा घेतली. मला हसू आवरता आले नाही. नंतर तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. एक तरुण मुलगा विराट आज एक खेळाडू म्हणून जगासमोर आहे. एका भारतीयाने माझा विक्रम मोडला यापेक्षा मी आनंदी होऊ शकत नाही.
विराट कोहली याने 113 चेंडूत 117 धावांची महत्वपूर्ण खेळी या सामन्यात साकारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय विराटने योग्य सिद्ध केला. वनडे क्रिकेटमधील हे त्याचे 50वे शतक होते. माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याला वनडे शतकांच्या बाबतीत त्याने मागे टाकले. विशेष म्हणजे सचिन स्वतः सामना पाहण्यासाठी वानखेडेच्या स्टॅन्डमध्ये उपस्थित असताना विराटने त्याचा हा विक्रम मोडीत काढला आणि वनडे क्रिकेमटध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला.
सचिनच्या वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर विराट सचिनकडे पाहून नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सचिन देखील स्टॅन्डमधून त्याला प्रोत्साहन देताना दिसला. दोघांमधील हे क्षण कॅमेरॉत कैद झाले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारताने या सामन्यात 50 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावा साकारल्या. यात सलामीवीर रोहित शर्मा याच्या 47 धावांचे योगदान होते. शुबमन गिल याने 80 धावा केल्यानंतर त्याच्या पायाच्या नसा तानल्या गेल्या आणि त्याला मैदान सोडावे लागले. विराटच्या 117 धावा, तर श्रेयस अय्यर याच्या 105 धावा संघासाठी महत्वाच्या ठरल्या, केएल राहुल यानेही 39* धावांचे योगदान दिले.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासाठी शतक झळकावणारा कोहली आता सौरव गांगुलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीनं २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील हे तिसरं शतक आहे. साखळी सामन्यांमध्ये त्यानं दोन शतकं झळकावली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं तिसरं शतक झळकावलं. विराट कोहलीनं १०६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्यानं १ षटकार आणि ८ चौकार लगावले. हे शतक झळकावल्यानंतर स्वतः सचिननं विराट कोहलीचं अभिनंदन केलं.
○ सर्वाधिक एकदिवसीय शतके :
विराट कोहली (भारत) – ५०
सचिन तेंडुलकर (भारत) – ४९
रोहित शर्मा (भारत) – ३१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – ३०
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – २८
○ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा :
विराट कोहली(२०२३) – ७११ धावा
सचिन तेंडुलकर (२००३) – ६७३ धावा
मॅथ्यू हेडन (२००७) – ६५९ धावा
रोहित शर्मा (२०१९) – ६४८ धावा
डेव्हिड वॉर्नर (२०१९) – ६४७ धावा
शकिब अल हसन (२०१९) – ६०६ धावा