पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीने शासनापुढे अहवाल सादर केला आहे. Dean of Pune Sassoon Hospital guilty in Lalit Patil drug case! Dean Sanjeev Thakur was finally expelled या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते दोषी आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांचे निलंबन केले आहे. माहितीनुसार, संजीव ठाकूर यांची आता विभागीय समिती मार्फत चौकशी होणार आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेले पुण्याच्या ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. यानंतर विरोधकांनी सातत्याने ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी होत होती.
ससून रुग्णालयातून ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. ससून मधील प्रकरण चर्चेत येण्यापूर्वी पूर्वीचे अधिष्ठाता राहिलेले डॉ. विनायक काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली करण्यात आली होती. बदली विरोधात डॉ. काळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा निकाल शुक्रवारी न्यायालयाने दिला आहे. त्यात पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील आरोग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. ते सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कार्यरत होते.
डॉ. काळे हे जे.जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रुजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली, तर डॉ. ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते- त्या विरोधात काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता.
मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्यात पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.