● पिस्तुल अन् जिवंत काडतुसे सापडले
जालना : जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. त्यांच्या जवळ गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस देखील आढळली आहेत. Antarwali Sarati stoning case; Four accused in police custody आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करत होते. यावेळी दगडफेकीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पिस्तुल अन् जिवंत काडतुसेसुद्धा सापडली आहेत. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसट, कैलास सुखसे यांच्यासह निलेश बळीराम राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी आरोपींची अंबड पोलीस ठाण्यात चौकशी केली.
आंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेक प्रकरणात 4 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. त्यावर सराटी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आंतरवालीत आमच्यावर हल्ला झाला होता त्यामुळे आमच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणात सरकारचा काहीतरी डाव आहे, असा संशय जरांगेंनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. आम्हाला न टिकणारे वेगळे आरक्षण नको, असेही ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणात चर्चेत आलेल्या पोलीस अधीक्षक तुषार दोशींची देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृहखात्याकडून बदली करण्यात आली होती. आता या बदलीला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाचे नेते दिपक केसकरांनी केली. लाठीमार प्रकरणाची चौकशी सुरू असताना अचानक बदली देणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. याबाबत त्यांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले होते.
● कुणबी कागदपत्रं ऑनलाईन पाहता येणार
राज्यात आता कुणबी नोंदी असलेले दाखले सापडत आहेत. अशातच राज्य सरकारकडे जमा झालेले कुणबी कागदपत्रे ऑनलाईन बघता येणार आहेत. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या कागदपत्रांमध्ये 1967 पूर्वी असलेल्या जाती आणि वंशावळीचे पुरावे आणि कागदपत्रे लवकरच पाहता येणार आहेत. ही कागदपत्रे महसूल विभाग आणि स्थानिक जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अंतरवालीतले कार्यकर्ते अटक करणार नाही, असं सरकारने सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करुन आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितलं होतं. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे. सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरी का अटक केली. या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतल्यानंतर मी बोलेन, असं देखील ते म्हणाले.