नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 370 कलम हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे. Supreme Court’s historic decision; The decision to delete Article 370 is permanent Chief Justice Naveen Pahat निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवट असताना राज्यासाठी केंद्राकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाला आव्हान दिले जावू शकत नाही, 370 कलम नेहमीसाठी नव्हते.’ दरम्यान केंद्र सरकारने 2019 मध्ये 370 कलम रद्द करत जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेशात विभागले होते.
सुप्रीम कोटनि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय कायम ठेवला, परंतु CJI DY चंद्रचूड यांनी देखील जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा लवकरच बहाल केला पाहिजे असे म्हटले आहे. CJI म्हणाले, ‘निवडणुकांसाठी लवकर पाऊले उचलली पाहिजेत. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्याव्यात. 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द केला आणि त्याला केंद्रशासित प्रदेश बनवले.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या 370 कलमासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला. निकालाचे वाचन करताना, ‘जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे, ते भारतात सामील होताच त्यांचे सार्वभौमत्व संपले होते. 370 कलम कायमची व्यवस्था म्हणून संविधानात सामील करण्यात आले नव्हते, केंद्राचा निर्णय संविधानानुसारच आहे,’ असे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे 370 कलम हटवण्याचा सरकारचा निर्णय कायम राहणार आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकाल वाचत असताना घटनात्मक पीठाचे तीन निकाल आहेत. पण तिन्ही निकालांचा निष्कर्ष एक आहे, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान 370 कलम रद्द करुन जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढणे हा निर्णय वैध आहे की अवैध याविषयी आज सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल देणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुप्रीम कोर्टाने आज जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवला. यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली. ‘निराश आहे, हिंमत कायम आहे, संघर्ष सुरुच राहील, भाजपा जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्यांना दशके लागली, आम्ही दीर्घ शर्यतीसाठी तयार आहोत,’ अशी पोस्ट त्यांनी X वर केली आहे. 370 कलम ही तात्पुरती तरतूद होती, असे कोर्टाने म्हटले होते.
जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज वैध ठरवला. यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोर्टाच्या निर्णयाचे कौतुक केले. “या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे. 370 हटवल्याने जम्मू-काश्मीरमध्ये नवी पहाट झाली आहे. एकसंघ भारत आजच्या निर्णयाने प्रस्थापित झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आभार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असंभव गोष्टी संभव केल्या आहेत,” असे ते म्हणाले.
○ 370 कलमावर सरन्यायाधीश म्हणाले..
* आम्ही संविधानातील 370 कलम हटवण्यासाठी राष्ट्रपतींच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला घटनात्मक आदेश वैध ठरवतो.
* जम्मू-काश्मीरपासून लद्दाखला वेगळे करण्याचा निर्णय आम्ही कायम ठेवतो.
* जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश आम्ही देत आहोत.
* 370 (3) कलम घटनात्मक एकीकरणासाठी होते, विभागणीसाठी नाही.