दक्षिण सोलापूर:- सहकारमहर्षी .वि.गु.शिवदारे आण्णा प्रशाला इंगळगी प्रशालेत कै.वि.गु.शिवदारे आण्णा यांची ९८ वी जयंती साजरी करण्यात आली.या जयंती चे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे स.म.वि.गु.शिवदारे आण्णा प्रशालेत वही वाटप कार्यक्रम कऱण्यात आला.
प्रशालेत कै.वि.गु.शिवदारे आण्णा ची ९८ वी जयंती असल्या कारणाने एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी प्रथमतः कै. वि.गु.शिवदारे च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी माने,प्रमुख पाहुणे महादेव कोगनुरे हे होते.तसेच उपाध्यक्ष इनोंदगी कोटे,सचिव चंद्रकांत गुरव,संचालक यलप्पा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे,उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख, नूरअहमद बागवान, भीमाशंकर बंदीछोडे, गोरख राऊत,यावेळी मुख्याध्यापक नेल्लुरे,शिक्षक कनोजी,व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी,प्रमुख पाहुणे मा.कोगनुरे साहेबांनी आण्णा चा राजकीय, सहकार,प्रवास विषयी आपले मनोगत व्यक्त केले.आणि विद्यार्थ्याना संबोधित करताना जीवनामध्ये,व शिक्षणा मध्ये मोठ होण्यासाठी स्वप्न बाळगा हा सल्ला त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.तसेच वह्या वाटप चा कार्यक्रम प्रमूख पाहुणे च्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले.तसेच सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ.१० वी ला प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी.वैष्णवी गुरव,द्वितीय विद्यार्थिनी कुमारी.जैतुन शेख, तृतीय विद्यार्थिनी कुमारी.पायल गाडेकर यांना बक्षीस व प्रमाण पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्षीय भाषण चंद्रकांत गुरव वि.गु.शिवदारे आण्णा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हमाणे ,तर आभारप्रदर्शन श्रीमती वंजारी यांनी मानले.