पिलीव प्रतिनिधी
संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्र भर संविधान जागर यात्रा फिरणार असून त्याची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी महाड येथील चवदार तळ्यापासून सुरुवात झाली.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असा अपप्रचार केल्याने अनुसूचित जाती व मागासवर्गीय समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करून घटनेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही व जो अपप्रचार चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे. १६ ऑगस्ट रोजी माळशिरस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचे जंगी स्वागत माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी नगरसेवक आकाश सावंत, ज्येष्ठ नेते बुवा नाना धाईजे, राजू सावंत, दत्तू सावंत, यशवंत मोहिते सह अनेक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वाल्मीक निकाळजे व नितीनजी मोरे यांनी समाजाला प्रबोधन केले.भारतीय घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली असून ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि भारतीय जनता पार्टी घटना बदलणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर राजेंद्र गायकवाड व योजनाताई ठोकळे याही उपस्थित होत्या. यावेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हार व फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सरगर, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा तथा अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना माळशिरस तालुका यांनी केले.