अक्कलकोट :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा संवाद मेळावा रविवारी वागदरी रस्त्यावरील टिनवाला फंशक्न हाँल येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडवणीस यांनी थेट प्रक्षेपणद्वारे उपस्थित महिलांशी संविद साधले. अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील बहिणींना भेट वस्तु व मिठाई देऊन सत्कार करण्यात आले.
दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, अप्पु बिराजदार, जयशेखर पाटील, शांभवीताई कल्याणशेट्टी, जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, लाडकी बहिण योजनेचे अशासकीय सदस्य अमोल हिप्परगी, महेश बिराजदार, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पु परमशेट्टी, महेश पाटील, शंकर भांजी, सलगरचे युवा नेते शिवराज बिराजदार, बसवराज शेळके, नन्नुभाई कोरबु, जकापूर सरपंच लक्ष्मीबाई वंटे, माजी सरपंच दिपाली आळगी, जयश्री बटगेरी, विश्रांती पाटील, सोनाली शिंदे, पुजा राठोड, भागुबाई कुंभार, धनंजय गाढवे, प्रकाश पाटील, बसवराज थंड आदींची प्रमुख उपस्थिती होते.
या कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवानंद पाटील, महेश हिंडोळे, अमोल हिप्परगी, सुरेखा होळीकट्टी आदीनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत महिला सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य, नगरसेवक, महिला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.