सोलापूर : पंढरपुरच्या विठुरायाची आषाढी एकादशीची महापुजा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. तर कार्तिकी एकादशीची महापुजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. पण यावेळी राज्याला 2 उपमुख्यमंत्री लाभले आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस तर दुसरे अजित पवार आहेत. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी पुजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा हा मंदिर समितीपुढे पेच आहे.
असा पेच पहिल्यादांच पेच निर्माण झाला आहे. कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी आहे. याच्या तयारीसाठी मंगळवारी मंदिर समितीची बैठक पार पडली. राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते पार पडते. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणाला द्यायचा हा प्रश्न मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. तर गेल्या कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे आता हा पूजेचा मान कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर तोडगा न निघाल्याने अखेर विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. आम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे आहेत. विधी व न्याय विभाग जो निर्णय देईल त्यानंतर कार्तिकी महापूजेचे निमंत्रण त्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले जाईल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
》 अजित पवार पुण्याचे तर चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री, अजितदादांविषयी मोठे वक्तव्य
मुंबई : राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
अखेर अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद पदरात पाडून घेण्यात यश आले आहे. तर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकात पाटलांची उचलबांगडी करत थेट सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. पण रायगड आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. पण हे पद त्यांना मिळाले नाही. आज एकनाथ शिंदेंनी 12 पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रवादीला 7 पदे मिळाले आहेत.
‘अजित पवारांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू’ अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. त्यातच आता या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात सीएम बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका मुलाखतीत बोलत होते.
पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचे टाळले होते. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती मिळतीय.
● राज्यातील सुधारित 11 जिल्ह्यांचे पालकमंत्री
= पुणे- अजित पवार
= बीड- धनंजय मुंडे
=अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील
= सोलापूर, अमरावती – चंद्रकांतदादा पाटील
= भंडारा- विजयकुमार गावित
= बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
= कोल्हापूर – हसन मुश्रीफ
= गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
= परभणी- संजय बनसोडे
= नंदूरबार- अनिल भा. पाटील = वर्धा – सुधीर मुनगंटीवार