Wednesday, May 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

तापसीचे कंगनाला प्रत्युत्तर; स्वार्थासाठी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा नाही उचलू शकत

Surajya Digital by Surajya Digital
July 22, 2020
in टॉलीवुड
0
तापसीचे कंगनाला प्रत्युत्तर; स्वार्थासाठी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा नाही उचलू शकत
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना राणावत व तापसी पन्नू या दोन अभिनेत्रींमध्ये वाद सुरू झाला आहे. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून हिणवलं होतं. त्यानंतर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं. मात्र हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असतानाच तापसीने या वादातून काढता पाय घेतला आहे. आपण कुठल्या विषयावर भांडतोय हे विसरण्याआधीच हा वाद मला संपवायचाय, असं तापसी म्हणाली.

“अरे? तर आता याचा शेवट कसा करायचा? कोण इनसाईड आणि कोण आऊट साईड यावर भांडण करायचं का? आता हे सर्व गुंतागुंतीचं होत चाललं आहे. आपण कशावर भांडतोय हे विसरण्याआधीच या वादावर मी पडदा टाकते.” अशा आशयाचं ट्विट तापसीने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

कंगना म्हणाली होती, या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली होती.

यावर मुलाखतीत तापसीने कंगनाच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. “करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला हाय, हॅलो, थँक्य यू संवादाशिवाय ओळखतसुद्धा नाही. माझं अस्तित्व माझ्या दिसण्यावरून आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय. नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही? मी कंगनाची साथ देत नाही म्हणून ती आणि तिची बहीण माझ्यावर असले आरोप करतेय. माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच चित्रपटांची निर्मिती कंगना म्हणते त्या माफिया गँगने केली नाही. आगामी चित्रपटसुद्धा त्यांच्यासोबत करत नाहीये. मग माझं अस्तित्व हा घराणेशाहीचा पुरावा कसा असू शकतो? स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही. या इंडस्ट्रीने मला माझी ओळख आणि पोट भरण्यासाठी खूप काही दिलंय. त्यामुळे या इंडस्ट्रीसोबत मी इतक्या कटू पद्धतीने वागू शकत नाही”, असं उत्तर तापसीने प्रत्युत्तर दिलं आहे.

Tags: #तापसी #कंगना #मृत्यू #स्वार्थ #फायदा #करणजोहर #माफिया
Previous Post

शिराळ्याची सर्जेराव नाईक बँक बोगस कर्जव्यवहाराने गाजू लागली

Next Post

सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर – मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर – मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग

सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर - मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग

वार्ता संग्रह

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
    Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697