सोलापूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यातूनच महापालिकेच्या परिवहन विभागातील सहा बसेस ‘आरोग्य तपासणी व रॅपिड अँटीजन टेस्ट’साठी मोबाईल क्लिनिक म्हणून आज, गुरुवारी सेवेत दाखल झाल्या आहेत. त्याची महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले जात आहे.
या बसच्या माध्यमातून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बसेसचे मोबाईल क्लिनिक मध्ये रुपांतर केले आहे. यामुळे प्रत्येक प्रभागातील रुग्णांची तपासणी करण्यास सोयीस्कर होणार आहे. रॅपिड एंटीजन टेस्ट घेण्यात येणार आहेत. या मोबाईल क्लिनिक बसची मागणी वाढली होती.
महानगरपालिकेकडे परिवहन विभागाच्यावतीने गेल्या दीड महिन्यापासून आरोग्य तपासणीसाठी मोबाईल क्लीनिकची उभारणी करण्यात आली होती. या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून शहरातील कंटेनमेंट झोन, नॉन कंटेनमेंट झोन येथील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येते. या मोबाईल क्लिनिकला प्रत्येक प्रभागात तपासणीसाठी वाढती मागणी आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून आणखी सहा बसेस ‘आरोग्य तपासणी व रॅपिड अँटीजन टेस्ट’साठी मोबाईल क्लिनिक म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. या मोबाईल क्लेनिकच्या या माध्यमातून प्रत्येक प्रभागांमधील ज्येष्ठ नागरिक, कंटेनमेंट झोन, नॉन कंटेनमेंट झोन येथील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
या बसेसची पाहणी आज, गुरुवारी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, परिवहन समिती सभापती जय संळुखे, परिवहन सदस्य अशोक यानगंटी, बाळासाहेब आळसांदे, गणेश जाधव, परीवहन व्यवस्थापक लिगाडे, वर्क्स मॅनेजर पाडगावनूर आदी उपस्थित होते.