सोलापूर : आज सोलापूर ग्रामीणमध्ये सहा मृत्यू तर नव्याने 137 नव्याने कोरोना बाधित रुग्ण; 1238 निगेटिव्ह तर 84 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण मृत्यू 69 तर बाधित 2666 निष्पन्न झाले आहेत.
ग्रामीण भागातील एक हजार 375 व्यक्तींपैकी 137 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये अक्कलकोट व पंढरपुरातील प्रत्येकी एक तर बार्शीतील चौघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दोन हजार 666 व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे 69 जणांचा मृत्यू झाला आहे.
* आज शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्यातील चौघांचा जणांचा समावेश आहे. बार्शीतील 65 वर्षीय महिला, वैराग येथील 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,कुसलंब येथील 72 वार्षिय पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोट माणिक पेठ येथील 76 वर्षीय पुरुष तर पंढरपूर रोहिदास चौक येथील 72 वर्षीय 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला.
(तुमचं हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
* तालुकानिहाय रुग्णसंख्या
अक्कलकोट 426, बार्शी 665, करमाळा 68, माढा 96, माळशिरस 108, मंगळवेढा 64, मोहोळ 192, उत्तर सोलापूर 215, पंढरपूर 310, सांगोला 36, दक्षिण सोलापूर 486 असे एकूण 2 हजार 666 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.