न्यूयॉर्क : श्री राम मंदिर भूमिपूजना दिवशी न्यूयॉर्कमध्ये 17 हजार चौरस फुटांचा एलईडी स्क्रीन सकाळी 8 वाजल्यापासून ‘जय श्रीराम’ अशी अक्षरे हिंदी आणि इंग्रजीतून झळकणार आहे. अशा स्वरुपाचा जगातील सर्वात मोठा डिजिटल बोर्ड असणार आहे.
या बोर्डावर त्याबरोबर श्रीरामांचे चित्र, व्हिडीओ, नियोजित राममंदिराचे 3 डी संकल्पना चित्र, या मंदिराचे डिजाईन, आर्किटेक्चरशी संबंधित चित्रे आणि पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यस हे सर्वकाही या अशा अनेक बिलबोर्डवर झळकणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय समुदायाचे सदस्य 5 ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअर येथे हा क्षण साजरा करण्यासाठी मिठाई वाटप करतील. असा क्षण आयुष्यात एकदा किंवा शतकात एकवेळ येत नसतो. तर मानवजातीच्या जीवनात एकदा येणारी ही घटना आहे. रामजन्म भूमी शिलान्यास साजरा करण्यासाठी आम्हाला ‘टाइम्स स्क्वेअर’ यापेक्षा उत्कृष्ट जागा आणि निमित्त तरी दुसरे कोणते असू शकेल, असे भारतीय समुदायाचे प्रसिद्ध नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेहानी यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयोध्येत राममंदिराचा शिलान्यास करतील तो ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी मोठी जय्यत तयारी न्यूयॉर्क शहरामध्ये करण्यात आल्याचे सांगितले.
भगवान श्री राम आणि अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या नियोजित राममंदिराची भव्य 3 डी प्रतिमा न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये साकारली जाणार आहे. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशीच एका भव्य बिलबोर्डवर प्रकाश किरणांनी या प्रतिमा साकरल्या जाणार आहेत. राममंदिराचे भूमिपूजन ही एक ऐतिहासिक घटना असेल म्हणून या घटनेला सर्व जगासमोर विशेष प्रसिद्धी देण्याच्या हेतूने भगवान राम आणि नियोजित राममंदिराच्या त्रिमितीतील प्रतिमा प्रकाश किरणांच्या माध्यमातून भव्य पडद्यावर साकारल्या जाणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.