लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमला राणी वरूण (वय 62) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची 18 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर कमला राणी वरूण यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कमला राणी वरूण यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. शिवाय, या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सध्या त्या तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते.
18 जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने त्यांना 2017 रोजी कानपूरच्या घाटमपूर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. ही जागा भाजपकडून जिंकवून आणणाऱ्या त्या पहिल्या आमदार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहात होत्या.
* कमला राणी वरुण यांची कारकीर्द
कमला राणी वरुण यांंच्या कारकीर्दी बाबत सांंगायचे झाल्यास, 1989 ते 1995 या काळात त्या महानगर परिषदेवर होत्या. 1996 मध्ये त्या 11 व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून त्या निवडून आल्या. 1996 ते 1997 पर्यंत त्यांनी कामगार व कल्याण समिती आणि उद्योग समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले. 1997 मध्ये महिला सबलीकरणावर समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 1998 मध्ये त्या दुसर्यांदा संंसदेत निवडून आल्या. 1998 ते 1999 दरम्यान त्यांनी अधिकृत भाषा समिती, कामगार व कल्याण समिती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीसमवेत विविध समित्यांच्या सदस्य म्हणून काम केले.
* मुख्यमंञी योगींचा अयोध्या दौरा रद्द
सध्याच्या योगी आदित्यनाथ यांंच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंंत्री होत्या. आज त्यांच्या मृत्यु नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज योगी आदित्यनाथ अयोध्येला जाणार होते.