भंडारकवठे : दक्षिण सोलापूर भंडारकवठे येथील माजी सहकारमंञी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यावर थकीत ऊस बिलासाठी महाराष्ट्र विकास आघाडी व क्रांतिवीर किसान सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काल शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आज दुस-यादिवशीही आंदोलन सुरु होते.
लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सहा महिन्यापासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत. येथे लोकमंगल नव्हे तर स्वमंगल होते आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण उसाचे बिल मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. दक्षिण सोलापूरच्या गरीब शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या उसाचे बिल तुम्ही वेळेवर का देत नाही, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऊसबिलाची विचारणाऱ्या शेतकऱ्यांनाच उलट दमदाटी केली जाते. देशात लोकशाही आहे मोगलाई नाही. लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करत आहोत. गेल्या महिन्यात शेतकरी आंदोलन केले. त्यावेळी जुलै अखेर सर्वांचे बिल देण्याचे कबूल केले. पण दिलेला शब्द त्यांनी पाळला नसल्याचा दावाही आंदोलक शेतक-यांनी केला.
गेली आठ महिने शेतकऱ्यांचे उसाचे बिल न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी लोकमंगल बँक, पतसंस्था या माध्यमातून कर्ज घेतले होते. परंतु गेले आठ महिने ऊस बिल न दिल्यामुळे ते व्याजासह ऊस बिल देण्याची मागणी केली.
यावेळी शेखर बंगाळे, बोळकवठेचे माजी सरपंच राम गायकवाड, करण गडदे, विंचूरचे सचीन साबळे, नरहरी वारे, महादेव मुक्काणे, रमेश बबलेश्वर, नागनाथ जंगलगी, देवण्णा पुजारी, रेवप्पा मकणापूरे बरुर, मल्लीकर्जून भांजे अरळी यांनी कारखाना प्रशासनावर टीका केली.
क्रांतिवीर किसान सेनेचे शेखर बंगाळे, करन गडदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. यावेळी करण गडदे, विंचूरचे सचीन साबळे, नरहरी वारे, महादेव मुक्काणे, रमेश बबलेश्वर, नागनाथ जंगलगी, देवण्णा पुजारी, रेवप्पा मकणापूरे बरुर, मल्लीकर्जून भांजे, कलप्पा गुणके, शरणप्पा हत्ताळे,मांतेश नागठाण, शंकर कुसुरे, रमेश बुगडे, रतनसिंग रजपूत, अमगोंडा भांजे, राजकुमार पुजारी, तिपण्णा हेगडकर अरळी यांनी कारखाना प्रशासनावर टीका केली.
आंदोलनस्थळी मल्लिनाथ बबलेश्वर, सुनील भरले, मुकेश व्हनकोरे, शरणाप्पा हत्ताळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पीएसआय गणेश पिंगूवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त तैनात केला आहे.