सांगली : सांगली जिल्ह्यात शनिवारी मनपा कार्यक्षेत्रामध्ये 92 नवीन रुग्ण, शहरी भागात 17, ग्रामीण भागात 47 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2 हजार 799 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे झालेले रुग्णसंख्या 1 हजार 266 झाली आहे.
उपचारा खाली 1 हजार 443 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 90 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी 138 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले. आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 036, शहरी भागातील 208, मनपा क्षेत्रातील 1 हजार 555 रुग्ण अशी आहे. ग्रामीणपेक्षा मनपा क्षेत्र रुग्ण संख्येत आघाडी घेऊ लागले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शनिवारी आलेल्या अहवालात नवीन पॉझिटिव्हमध्ये आटपाडी तालुका 3, जत तालुका 2,कडेगाव तालुका 7, कवठेमहांकाळ तालुका 11, खानापूर तालुका 1, मिरज तालुका 19,पलूस तालुका 0,शिराळा तालुका 3, तासगाव तालुका 17, वाळवा तालुका 1, सांगली 73, मिरज 19 अशी आहे.
मृतांमध्ये सांगली येथील 62, 44, 64, 63,83, वर्षांचे पुरुष. सांगलीतील 82 वर्षांची महिला, तासगाव येथील 64 वर्षांचा पुरुष, जत येथील 30 वर्षांचा पुरुष, मिरज व बेडग येथील 78 व 60 वर्षांचा पुरुष, बुधगाव येथील 54 व 63 वर्षांचा पुरुष अशी आहे.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या
आटपाडी 138, जत 154, कडेगाव 69, कवठेमहांकाळ 98, खानापूर 58, मिरज 206, पलूस 121, शिराळा 192, तासगाव 87, वाळवा 121, मनपा 1 हजार 555 अशी आहे.