लंडन : करोनाबाधितांना सौम्य लक्षणे असतील किंवा ते सायलेंट कॅरिअर आहेत का ते पडताळून पाहण्यासाठी आता श्वानांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती एका संकेतस्थळाने येथिल तज्ञांच्या हवाल्याने दिली आहे.
श्वान उत्तेजक द्रव्य पदार्थ, स्फोटके तसेच गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी केला जातो. आता त्यांच्याच मदतीने मलेरियासह विविध विषाणूंची बाधा झालेल्या व्यक्तीही शोधल्या जाणार आहेत. श्वानांची वासाद्वारे शोधशक्ती जगात सर्वात जास्त असते. त्यामुळे जर ब्रीटनसह जगभरात असा प्रयोग केला व त्यात यश आले तर ती नवी क्रांती ठरेल, असा दावाही संशोधकांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी सध्या विवध अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र, येथील काही तज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनात श्वानांची श्वसनशक्ती जगात सर्वात जास्त असल्याने त्यांच्या मदतीने कोरोनाबाधित शोधले जाऊ शकतात असा दावा केला होता. त्याच अंतर्गत चीलीसब आता ब्रीटनमध्येही श्वानांची मदत घेण्याचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी लॅब्रेडॉर व गोल्डन रिट्राइव्हर्स या जातीच्या श्वानांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोरोनाबाधित असल्याची शंका आल्यास श्वानांच्या मदतीने या व्यक्तीच्या घामावरुन त्याला बाधा झाली आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. चीलीमध्ये काही श्वानांना प्रशिक्षणही दिले गेले असून त्यांच्या मदतीने काही व्यक्तींबाबतचा संशय खरा ठरलेला आहे.