पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझे संबंध अनेक गुंडाशी असून, नीट रहा असे म्हणत त्यांनी मेव्हण्याला धमकावले. त्याशिवाय उषा काकडे यांनीही भावाला शिवीगाळ करीत धमकाविले आहे.
याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय आणि उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ढमाले बांधकाम व्यावसायिक असून ते संजय काकडे यांचे मेहुणे आहेत. भागीदारीत बांधकाम व्यावसाय करीत असताना 2010 पासून युवराज यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे काकडे आणि ढमाले कुटुंबीयात वाद सुरू झाले. यातूनच संजय काकडे यांनी मेव्हण्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) फिर्याद दिली आहे. त्यावरुन संजय काकडे (वय 52) आणि उषा काकडे (वय 44, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युवराज ढमाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागीदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हटले आहे.