सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी 151 नवे रूग्ण आढळले तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासदायक बाब म्हणजे सोमवारी 101 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
आज सोमवारच्या अहवालानुसार ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 94 झाली आहे तर मृतांची संख्या 120 झाली आहे. यामध्ये 80 पुरूष तर 40 स्त्रियांचा समावेश आहे. सोमवारी सर्वाधिक 64 रूग्ण बार्शी तालुक्यात सापडले. याशिवाय पंढरपुरात 25 तर माढ्यात 21 रूग्ण आढळले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातील 11 तालुक्यांत आज 151 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रूग्णसंख्या 4 हजार 94 झाली आहे. लिंबिचिंचोळी (दक्षिण सोलापूर), पंढरपुरातील कोर्टी, नान्नज, वडाळा, अक्कलकोटमधील इंदिरा नगरातील, करमाळ्यातील फंड गल्ली, माढ्यातील लऊळ, बार्शीतील आडवा रस्ता येथील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.