बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी 47 ने वाढ झाली असून त्यामधील 29 रुग्ण शहरामधील तर ग्रामीण मधील 18 आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1हजार 117 वर पोहचली आहे.
बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या अल्पावधीतच चार आकडी झाल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आखलेली विद्यमान रणनिती फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रणनितीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
एकूण बाधित रुग्णांपैकी शहरामधील रुग्ण 645 असून ग्रामीण मधील 472 आहेत. मंगळवारी एकूण 2 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्याही वाढली आहे. शहरमध्ये एकूण 20 आणि ग्रामीण मध्ये 20 असे एकूण 40 रुग्ण आजपर्यंत मयत झाले आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही 625 वर गेली असून त्यापैकी शहरातील 320 तर ग्रामीणमधील 305 आहेत.
आजपर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण 146 तर ग्रामीण मध्ये 55 असे एकूण 201 प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वॅब चाचणीच्या आज मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, कासारवाडी रस्ता 1, वाणी प्लॉट 2, पंकजनगर 3, नेटके प्लॉट 2, सोलापूर रस्ता 1, लहुजी चौक 3, पाटील चाळ 1, बेदराई गल्ली 1, बुरुड गल्ली 3, उपळाई रस्ता 1, सुभाष नगर 1, आडवा रस्ता 1, पराग इस्टेट 2, आझाद चौक 1, फुले प्लॉट 2, भराडीया प्लॉट 1, वाणी गल्ली 1, भिसे प्लॉट 1, सन्मित्र हौसिंग सोसायटी 1, असे एकूण 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर ग्रामीण मध्ये वैराग 4, आगळगाव 1, उपळे दुमाला 2, रातंजन 2, भोयरे 2, उंबरगे 1, खामगाव 5, घारी 1, असे एकूण 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.