मुंबई : वयाच्या २० व्या वर्षापासून प्रत्येक कारसेवेत मी भाग घेतला. यात तुरुंग पाहिला, असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्त त्यांच्या कारसेवेच्या आठवणीत एका वृत्त वाहिनीला सांगितले. यात त्याने तुरुंगवास भोगल्याचे सांगत लाठीचार्ज भोगून खांद्यावरुन गोळी जातानाही पाहिल्याचे सांगितले आहे.
रामजन्मभूमी खटल्याचा निकाल आला तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. इतक्या वर्षांच्या संघर्षातनंतर यश आले. जेथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेथे मंदिर होते आहे. २० व्या वर्षी ३० सप्टेंबर १९८९ ला पहिल्यांदा कारसेवेसाठी गेलो होतो. काँग्रेसच्या नेत्यांना राम शिला पूजेचं यजमानपद घेण्यास सांगितले होते. तेव्हा अखिल भारतीय परिषदेचा गट घेऊन उत्तर प्रदेशात गेलो. देवरा बाबांकडून पुढील सुचना मिळणार होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवरा बाबांकडून माहिती घेतली. मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद असल्याचे कळले. सत्याग्रह करत अटक करून द्यायची असे त्यांनी सांगितले. मी मात्र अटक करून घेणार नाही असे सांगितले. एका बाबांच्या आश्रमात पाच -सहा दिवस राहिलो. तिथे ३ अंश सेल्सिअस तापमान असायचे. पुढे शंकराचार्यांसोबत पायी निघालो. आम्हाला गंगेवरील एका पुलावर थांबवले. तेथे लाठीचार्ज झाला. शंकराचार्यांना अटक करण्यात आली. तेव्हा खांद्यावरुन बंदुकीच्या गोळ्या जाताना पाहिल्याचे सांगितले.
जवळपास १५ दिवस बदायुच्या तुरुंगात होतो. तुरुंगात रामनाम जपायचो. कैद्यांनाही जपायला लावायचो. ज्या तुरुंगात होतो, त्या तुरुंगाच्या जेलरची दोन्ही मुले कारसेवेसाठी गेली होती. त्यामुळे त्यांना आम्ही आल्याचा आनंद झाला. घरच्यांना प्रचंड काळजी वाटत होती. माझ्या पायाला गोळी लागली अशीही अफवा घरी पोहचली. त्यामुळे घरचे अधिक काळजीत पडले होते, असे फडणवीस म्हणालेत.
ते म्हणाले, “कारसेवेच्यावेळी लाखो लोक जमा झाले होते. एक मूठ वाळू एका ठिकाणी टाकायची असे सांगण्यात आले. त्याचवेळी काही लोक अचानक ढाच्याकडे पळाले आणि त्यांनी तो तोडणे सूरू केले. काही लोक राखीव पोलिसांना अडवत होते. तो उन्माद दुसऱ्या धर्माच्या विरोधात नव्हता, तर राम मंदिरासाठीची भावना होती. सर्व कारसेवकांनी रात्रीतून मंदिर बांधलं होतं. आम्ही मंदिराकडे जात असताना पोलिसांनी हटकले. त्यानंतर आम्हाला धर्मेंद्र महाराजांनी अयोध्या सोडण्यास सांगितले, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.