सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. आज मंगळवारी आणखी 207 नवे रूग्ण आढळले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासदायक बाब म्हणजे मंगळवारी तब्बल 222 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मंगळवारच्या अहवालानुसार ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 301 झाली आहे तर मृतांची संख्या 127 झाली आहे. मंगळवारी सर्वाधिक 45 रूग्ण माढा तालुक्यात आढळले.
मृतांमध्ये कुर्डू (ता.माढा), चपळगाव (अक्कलकोट), आढीव आणि प्रतिभाताई परिचारक नगर (पंढरपूर), नान्नज (उत्तर सोलापूर), वैराग आणि एकविराई मंदिर (बार्शी) येथील व्यक्तींचा समावेश आहे. मंगळवारी 222 जणांना उपचार करून घरी सोडले आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील 2 हजार 571 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 1हजार 603 जणांवर उपचार सुरू आहेत.