अयोध्या : प्रभू रामाला मिशा असल्या पाहिजेत या संभाजी भिडे यांच्या मागणीला अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी भिंडेंना अज्ञानी म्हटले आहे. रामासारख्या देवतेला कधीही मिशा दाखवल्या जात नाही, जर कोठे मिशा दाखवल्या गेल्या असतील तर ते संभाजी भिडे यांच्यासारख्या अज्ञानी लोकांमुळे, असे टीकास्त्र त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर सोडले आहे.
संभाजी भिडे यांच्याकडून प्रभू श्रीरामांच्या मूर्ती संबंधी करण्यात आलेल्या मागणीला अयोध्या राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी चुकीचे ठरविले आहे. कुठेही श्रीराम, कृष्ण तसेच शिवशंकरांच्या मूर्तीला मिश्या नाहीत. तिन्ही देवता षोडषवर्षीय म्हणजे सोळावर्षाच्याच मानल्या जातात. ते जोपर्यंत भूतलावर राहतील तोपर्यंत सोळा वर्षाचेच राहतील, असे मत दास यांनी व्यक्त केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिंदू धर्मात तीन देवता राम, कृष्ण तसेच शिवशंकराची मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते. या सह पंचमुख ब्रम्हा यांचे वय देखील मर्यादित आहे. परंतु, राम सदैव तरुणावस्थेत पूजले जातात. संभाजी भिडेंची मागणी योग्य नाही. मिशी असलेल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती कुठेच बघायला मिळत नाही. जर कुठे अशी मूर्ती असेल तर ‘त्यांच्या’ सारख्यांच्या अज्ञानामुळे आहे, अशा शब्दात दास यांनी भिडे गुरुजींवर टीका केली आहे.
भगवान राम, लक्ष्मण तसेच हनुमंताची मूर्ती मिशी रहित बनवणे ही कलाकरांची चूक आहे, असे वक्तव्य अलिकडेच भिडे गुरुजी यांनी केले होते. राम एक प्रेरणादायक पुरुष देवता आहेत. या सह लक्ष्मण तसेच हनुमान देखील पुरुष देवता आहेत. अशात त्यांना मिशी रहीत दाखविणेही चित्रकार तसेच मूर्तीकारांची ऐतिहासिक चूक आहे. त्यांच्या मूर्ती मिशी असलेल्या असाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
संभाजी भिडे यांनी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरात मिशीवाल्या श्रीरामांची मूर्ती असावी, अशी मागणी केलीये. त्यांनी म्हटलंय की मूर्तीवर मिशा नसणे ही मूर्तिकारांनी केलेली ऐतिहासिक चूक आहे. ही चूक सुधारली गेली नाही तर त्यांच्यासारख्या भक्तांसाठी अयोध्येतील राम मंदिराचं काहीही महत्व उरणार नाही. म्हणूनच आता ही चूक सुधारून अयोध्येतील राम मंदिरात मिशीवाल्या श्रीरामांची मूर्ती स्थापन केली गेली पाहिजे
संभाजी भिडे यांनी श्रीरामांच्या मूर्तीत मिशांची कल्पना तर केलीये, मात्र हिंदू धर्मात ब्रह्मदेवाला सोडून कोणत्याही देवाच्या तसबिरीत किंवा मूर्तीत मिशा दिसत नाहीत. अगदी काही ठिकाणी शंकर देवांच्या फोटोत किंवा मूर्तीमध्ये मिशा पाहायला मिळतात.
मात्र श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण या देवतांच्या तसबिरी किंवा मूर्ती या बिना मिशीच्याच पाहायला मिळतात. ईश्वर चिरतरुण असतात अशी मान्यता असल्याने तसबिरी किंवा मुर्त्यांमध्ये देवतांना मिशी रदखवली जात नाही. मात्र संभाजी भिडे यांची मागणी या मतापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यासाठी संभाजी भिडे यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना तशाप्रकारची विनंती देखील केलीये. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला मिशा असणं केवळ ते पुरुष देवता असल्याने महत्त्वाचं असल्याचं समजतं.