मुंबई : चालू वर्षात अनेक मृत्यू पहिले. भारतामध्येही मुख्यत्वे टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे वर्ष काळवर्ष ठरले. टीव्ही अभिनेता समीर शर्मा याच्या आत्महत्येची बातमी आली होती, आता टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे समजत आहे. आर्थिक अडचणी आणि फसवणुकीतून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारी, 2 ऑगस्ट रात्री अनुपमाने गळफास लावून आत्महत्या केली. एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी अनुपमाने एक सुसाइड नोटही सोडली असून, त्यात तिने फाशी घेण्याची कारणे दिली आहेत. अनुपमा मुंबईच्या दहिसर चौकीवर असलेल्या ठाकूर मॉलजवळील एमएमआरडीए इमारतीत भाड्याच्या घरात राहत होती.
रविवारी रात्री फाशी घेण्यापूर्वी अनुपमाने फेसबुक लाईव्ह केले होते. यामध्ये तिने आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. यासाठी दिलेल्या पहिल्या कारणाबाबत ती म्हणते, ‘मनीष झा नावाच्या व्यक्तीने लॉकडाऊन दरम्यान मे महिन्यात आपली दुचाकी घेतली होते. त्यावेळी आपण आपल्या गावी होते. मात्र आपण मुंबईमध्ये परत आल्यावर मनीषने ती गाडी परत देण्यास नकार दिला.
दुसरे कारण देताना ती म्हणते, ‘डिसेंबर 2019 मध्ये एका प्रॉडक्शन कंपनीत आपण 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हे पैसे व्याजासहित परत येणे होते. मात्र त्याबाबत आपली फसवणूक झाली व हे पैसे मिळाले नाहीत.
टीव्ही कलाकार समीर शर्मा याच्या आत्महत्येनंतर चार दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका कलाकाराच्या आत्महत्येचा विषय आज चर्चेला आला आहे. 2 ऑगस्ट रोजी भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी देखील मुंबईतील घरात आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी अनुपमा या फेसबुकवर 10 मिनिट लाईव्ह होत्या. या लाईव्हमध्ये लोक आत्महत्या का करतात? या विषयावर त्या बोलत होत्या. ‘माझ्या मृत्यूला केवळ मीच जबाबदार असेन’, असे वाक्य त्यांनी लाईव्हमध्ये म्हटले होते. आपल्या लाईव्हमध्ये अनुपमा या भावनिकदृष्ट्या ढासळलेल्या स्थितीत दिसून आल्या. “या जगात कुणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही कुणाला विश्वासाने काही सांगायला गेलात तरी तुमची नंतर थट्टा केली जाते.
आत्महत्या करण्याआधी कुणीही तुमच्याशी नीट बोलायला तयार नसते. एकदा तुम्ही या जगातून निघून गेला की, सर्वजण मदतीची भाषा वापरतात. मला सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं, अशी पोकळ वक्तव्ये केली जातात.”, अशी खंत अनुपमा यांनी बोलून दाखवली होती.
* चंदेरी दुनियेत आत्महत्या सत्र चालूच
चंदेरी दुनियेतील आत्महत्याचे सत्र चालूच आहे. यापूर्वी कुशल पंजाबी, सेजल शर्मा, सुशांतसिंह राजपूत, समीर शर्मा आणि मनमीत ग्रेवाल अशा कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील सुशांतसिंहची आत्महत्या चंदेरी दुनियेत वेगवेगळे वळण घेत आहे. थेट राजकारणापर्यंत हा विषय गेला आहे.