मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वेने आपल्या गाड्या 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्याच्या बातम्या सध्या माध्यमांकडून दिल्या जात आहेत. सोशल मिडियावरही अशा आशयाच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. मात्र रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट की, रेल्वे बोर्डाने गाड्या पुन्हा सुरू किंवा रद्द करण्याबाबत कोणतेही नवीन परिपत्रक जारी केलेले नाही. विशेष ट्रेन्स नियोजित वेळेनुसारच चालतील असं स्पष्टीकरण रेल्वेने दिलं आहे.
पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेच्या काही सेवा स्थगित राहतील व स्पेशल मेल एक्स्प्रेस गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरूच राहतील. रेल्वेने ट्वीट करत सांगितले आहे, ‘मीडियाचे काही विभाग रिपोर्ट करीत आहेत की, 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वेने सर्व नियमित गाड्या रद्द केल्या आहेत. मात्र हे खरे नाही. रेल्वे मंत्रालयाने कोणतेही नवीन परिपत्रक जारी केलेले नाही. स्पेशल मेल एक्स्प्रेस गाड्या चालू राहणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. 11 ऑगस्टच्या अधिसूचनेमध्ये असेही म्हटले आहे की, गाड्या रद्द करण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी, विशेष मेल आणि एक्स्प्रेस गाड्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
मुंबईत, अत्यावश्यक सेवा कामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या मर्यादित लोकल गाड्यांचेही काम सुरू राहणार आहे. याआधी रेल्वेकडून गाड्या 12 ऑगस्ट पर्यंत बंद राहतील असे सांगण्यात आले होते. मात्र या निर्णयाचा गणेशोत्सवाच्या अगोदर कोकणसाठी नियोजित असणाऱ्या विशेष गाड्यांवर परिणाम होणार नाही. मध्य रेल्वे कोकणसाठी दररोज चार गाड्या चालवणार आहे. लॉक डाऊननंतर पहिल्यांदाच आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरु केली जात आहे.
* गणेशोत्सवानिमित्तच्या गाड्याही धावतील
गणेशोत्सवादरम्यान कोकणात सोडण्यात येणाऱ्या गाड्या नियोजनानुसार धावतील. मध्य रेल्वेकडून दिवसाला ४ ट्रेन्स चालवल्या जातात. त्यातील २ ट्रेन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर उर्वरित ट्रेन्स लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवरुन सुटतात. पश्चिम रेल्वेतून आठवड्याला ५ ट्रेन्स सुटतात. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष एक्सप्रेस सोडल्या जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 11 मे रोजी रेल्वेकडून काढण्यात आलेल्या पत्रात विशेष ट्रेन्स वगळता उर्वरित रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित राहतील असं सांगितलं होतं.