मुंबई : अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. यात आता भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत आमदाराच्या घरातील ६ जणांनाही कोरोनाबाधा झाल्याची माहिती आहे.
याबाबत आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, ४ ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अन्टीजन टेस्ट केली. परिवारातील ६ सदस्य कोरोना बाधित आले. शनिवारी परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे RT PCR केले. माझ्यासह परिवारातील ३ तर संपर्कातील ३ बाधित तर ३ अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. काळजी घेतो आहे. आपणही घ्या असं त्यांनी सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे कॉल येतात. पण सर्व कॉल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास एसएमएसद्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन, असा विश्वास आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. तर व आमदार सुजितसिंह यांच्या परिवारातील सर्व जण कोरोनावर मात करून नक्की परत येतील ही खात्री आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.