मॉस्को : रशियाने कोरोनाविरूध्दची वॅक्सीन बनवल्याचं रशियाचे व्दालमिर पुतीन यांनी आज बुधवारी जाहीर केलं आहे. त्याबाबत एएफपी वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. कोरोनाविरूध्दची जगातील पहिली वॅक्सीन उपलब्ध झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर रशियाने कोरोनालसीची नोंदणी केली असून तशी घोषणा केली आहे.
जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना, रशियातून एक चांगली बातमी आली आहे. रशियाच्या कोरोना लशीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे.
रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.