मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत आदित्य ठाकरेंना समर्थन दिले असून ठाकरे कुटुंबतला व्यक्ती असे करुच शकत नसाल्याचे आवर्जून सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजप नेते नारायण राणे यांनी उघडपणे आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मात्र, या प्रकरणावर मनसेने आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. “ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचं समर्थन असल्याचं उघड झालं आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच उत्तर दिलं आहे. “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे”, अशी प्रतक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली होती. तसेच आपण ठाकरे कुटुंबातील असून असे आपण करणार नसल्याचेही म्हटले होते.