सांगली : मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरेश खाडे यांच्याबरोबर कुटुंबातील ८ सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे. सुरेश खाडे यांच्यावर मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार खाडे यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विचारणा केली. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या आमदार खाडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला. तसेच कार्यकर्त्यांनी काळजी करुन नये मात्र सुरक्षेसाठी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते बाहेर फिरत होते. त्यातूनच त्यांना लागण झाली असावी.
आमदार खाडे यांचे स्वीय सहायक आणि अंगरक्षक यांची कोरोना तपासणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल आहे. स्वीय सहायक आणि अंगरक्षक यांना काळजी म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आमदार खाडे यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा जणांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.