सोलापूर : सोलापूर शहरात आचच्या शुक्रवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 45 रुग्ण आढळून आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 हजार 700 कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. तर 82 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 26 पुरूष आणि 35 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 689 झाली आहे. त्यामध्ये पुरुष 3 हजार 311 तर महिला 2 हजार 378 रुग्णांचा समावेश आहे. आज दोन पुरूषांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यशोधरा हॉस्पिटलमधील मंगळवार पेठ परिसरातील 78 वर्षाचे पुरूष आणि सिव्हिल हॉस्पिटल मधील शेळगी रोड भवानी पेठ परिसरातील 98 पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 387 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 258 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.
शुक्रवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 2 हजार 216 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 170 अहवाल निगेटिव्ह तर 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 43 हजार 772 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 38 हजार 83 अहवाल निगेटिव्ह तर 5 हजार 689 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 902 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 400 आहे.