सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शुक्रवारच्या अहवालानुसार नव्याने 288 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत तर तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 7 हजार 60 एवढी झाली आहे. पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आज शुक्रवारी एकूण 2 हजार 628 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आढीव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षीय महिला, वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 73 वर्षीय पुरुष तर चिखर्डे (ता. बार्शी) येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 126 तर बार्शीत 48 रूग्ण आढळले. बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, आझाद चौक, भीमनगर, भिसे प्लॉट, चिंचोळी, फुले प्लॉट, गादेगाव रोड, घारी, हांडे प्लॉट, जैनमंदिर, जावळे प्लॉट, कसबा पेठ, खामगाव, लहुजी चौक, लक्ष्मीनगर, पांगरी, रामभाऊ पवार चौक, राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेळगाव, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग येथे रुग्ण आढळून आले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील आढीव, आंबेडकरनगर, अनिल नगर, बादलकोट, फरतळे दिंडीजवळ, गजानन महाराज मठाजवळ, नागपूरकर मठाजवळ, भजनदास चौक, भक्ती मार्ग, भोसे, भुवनेश्वरी मठ, डाळे गल्ली, डोंबे गल्ली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडबेगल्ली, करकंब, करोळे, कासेगाव, कौठाळी, कवठेकर गल्ली, खर्डी, कोळेगल्ली, कुंभार गल्ली, लकेरी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, महावीरनगर, मटन मार्केट, मेंढापूर, मुंढेवाडी, नवीन बागवान मुहल्ला, पंचमुखी मारुती, पुंडलिक नगर, रांझणी, रोपळे, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, सरकोली, सावता माळीमठ, शासकीय वसाहत, शिवाजी चौक, सुलेमान चाळ, तुंगत, उमदे गल्ली, उंबरेपागे, वाखरी, विस्थापितनगर, विठ्ठल नगर येथे नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
अद्यापही रुग्णालयात 2 हजार 769 जणांवर उपचार सुरु आहेत. 4 हजार 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 138 जणांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहे.
* तालुकानिहाय कोरोनाबाधतांची संख्या
अक्कलकोट-585, करमाळा-303, माढा-480, माळशिरस-559, मंगळवेढा-250, मोहोळ-416, उत्तर सोलापूर-455, पंढरपूर-1577, सांगोला-284, दक्षिण सोलापूर-757, एकूण-7060