मुंबई:-सर्जिकल स्ट्राइक असं जेव्हा ऐकू येतं तेव्हा साऱ्या भारताला पाकिस्तानवर आपण केलेल्या हल्ल्याची आठवण येते.ह्या घटनेची आणि या शब्दाची जोरदार चर्चा त्यावेळेस अनेक प्रसार माध्यमातुन करण्यात आली.बऱ्याच लोकांना यात नावीन्य जाणवलं तर काहींना याचं कुतूहल! पण भारतासह साऱ्या महाराष्ट्राला याचा अभिमान असला तरी नवं असं कांही नव्हतं, कारण महाराष्ट्राच्या आराध्यदेवानं आधीचं ही सिद्धी दाखवलेली!या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात,डोळ्यात पाणी येतं आणि फक्त एकचं नारा निघतो, हर हर महादेव! . ६ एप्रिल १६६३.
“कसबे पुणे,लाल महाल ” महाराज स्वतः आणि सोबत निष्ठावंत मावळे, ज्या स्वराज्यावर वाकडी नजर केलेल्या एकचीही गय महाराजांनी व राजमाता जिजाऊंनी केली नाही अशा स्वराज्याकडे बोट करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटचं महाराजांनी छाटली पण बिनबोटांच्या मामामुळे आलमगीर भाच्याचं नाक कापलं गेलं.कुठलीही टेक्नोलॉजी नसताना फक्त
टेकनीक वापरून ही कामगिरी फत्ते केली.पण हे सगळं सहज शक्य होत का? नाही,यासाठी महाराजांचे नियोजन निर्णायक ठरले आणि या मोहिमेची किर्ती तर इतकी की इंग्रजी
इतिहासकारांकडुन याच्यावर अभ्यास करण्यात आला.टीमवर्क आणि लिडरशिप याचा फक्त अर्थ कळतो आपल्याला पण प्रत्यक्षात महाराजांनी हे कृतीतून करून दाखवले आणि यासाठी निवडले गेले मात्तब्बर
व निष्ठावंत मावळे यामध्ये कोणाचा प्रामुख्याने सहभाग होता?
1) नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे:-महाराजांचा उजवा हात,निडर आणि स्वामिसेवेस तत्पर होते.
2) सरसेनापती येसाजी कंक:-बलाढ्य बलशाली. महाराजांच्या एका शब्दाखातर ज्यांनी हत्ती लोळवला असे येसाजी कंक.
3) सरदार बाजी सर्जेराव जेधे:-प्रेमळ,महाराजांशी एकनिष्ठ आणि स्वराज्यासाठी कुणाचीही गय न करणारे घरंदाज सरदार.
4) सरदार कोयाजी बांदल :- खिंड पावनकरणारे आणि बाजीप्रभूंसोबत लढणारे बांदलाप्रमाणेच स्वराज्यसेवेत सगळ्यात पुढे असणारे सरदार.
5) बहिर्जी नाईक:- गुप्तहेर खात्याचे प्रमुख,अनेक भाषा बोलता येणारे,वेषभूषेचे ज्ञान असणारे पाण्याप्रमाणे कुठंही समरस होणारे,शत्रुच्या गोटात
महाराजांचा डंका वाजवणारे आणि आजच्या जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना मोसाद (इस्राईल) चे गुरू आहेत बहिर्जी नाईक. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक हाही शिव विचारच आहे आणि म्हणुनचं म्हणतात की “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा”
छत्रपती शिवाजी महाराजांची ही कामगिरी जर आपल्याला पाहायला मिळाली तर?? होय हे शक्य आहे आणि ती कामगिरी अगदी हुबेहुब निभावली दिगदर्शक दिगपाल लांजेकरांनी.
फत्तेशीकस्त सिनेमाचे नियोजन इतके काटेकोर पद्धतीने केले गेले की कुठेही नावं ठेवायला जागा उरली नाही.
सर्वप्रथम यातील ठळक मुद्दे
1) कथा :- मुळं इतिहासाशी कुठलीही छेडछाड न करता अगदी डोळ्यासमोर घडलेल्या प्रसंगाची अनुभुती अगदी सहजपणे अनुभवायला मिळते.
2)संगीत :- चित्रपटाची सगळ्यात महत्वाची बाजू. त्याकाळातील संस्कृतीचा विचार करूनच बनवली गेली
किर्तने,जोगवा,कव्वाली,
ठुमरी,पोवाडा. देवदत्त मनीषा बाजी यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.
3) लोकेशन्स:- ऐतिहासिक चित्रपटासाठी सगळ्यात मोठे आव्हान असते लोकेशन चे कारण ही ठिकाणं म्हणजेचं महाराजांचे गड व किल्ले असल्याकारणाने त्यात हवा तसा कोणताही बदल आपण करू शकत नाही आणि सध्याची गडांची अवस्था पाहता चित्रपटात त्यांचा वापर खुपचं सुंदरपणे करण्यात आला आहे.
4)निर्माते:– अलमंड क्रियेशन्स ने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि त्यांनी ती जवाबदारी अतिशय उत्तम रित्या सांभाळली आहे.मराठी सिनेमाची निर्मिती करणं ही फार मोठी जोखीम आहे कारण अपेक्षित रिटर्न्स मिळणं थोडंस कठीण असत आणि अशा मोठ्या बजेटचे सिनेमे बनवताना कुठंही कसलीही कसर त्यांनी ठेवली नाही.
5) दिग्दर्शक:-दिगपाल लांजेकर बस नाम ही काफी हें. फर्जंद नंतर हा त्यांचा दुसरा चित्रपट आणि एक दिग्दर्शक म्हणुन त्यांनी हा रोमाचंक व चित्तथरारक अनुभव विथ झिरो एरर त्यांनी प्रेक्षकांना दिला.ही सिनेनिर्मिती नसुन महाराजांना अर्पण केलेले एक पुष्प आहे असेही ते म्हणतात.
6) कलाकार:- सिनेमातील सगळ्यात महत्वाची बाजु कास्टिंग ची असते आणि त्याबतीत दिगदर्शकांनी 100 पैकी 100 गुण मिळवले.
राजमाता जिजाऊ:- मृणाल देव यांनी ही भुमिका दोन्हीही सिनेमात उत्तम पणे साकारली आहे.त्या जशा पडद्यावर येतात तशी त्यांच्यावरून नजर हटत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज:- चिन्मय मांडलेकर यांना महाराजांच्या वेशभूषेत पाहिलं की आपसुक तोंडातून ‘राजं’ अस निघतं आणि हात मुजरा करण्यासाठी खाली जातात.
सुभेदार तान्हाजी मालुसरे:- अजय पुरकर यांनी ही भूमिका हुबेहुब साकारली आहे त्यांना पाहिलं की असं वाटतं की हेच आपलं सुभेदार. अजय देवगणच्या तान्हाजी मुळे सुभेदार भारतभरं पोहचले हे खरं पण अजय पूरकर हेच तान्हाजी जास्त वाटतात.
सरसेनापती येसाजी कंक:- अंकित मोहन यांची पिळदार शरीर यष्टी आणि बोलणं हे दोन्ही पण पाहिलं की फक्त एकचं आवाज येतो व्वा येसाजी राव!
बहिर्जी नाईक:- हरीश दुधाडे ह्यांचा जन्मचं या व्यक्तिरेखेसाठी झाला आहे.इतके परिपक्व बहिर्जी त्यानीं साकारले आहेत.गुप्तहेर खात्याचे हे खरोखरचं प्रमुख वाटतात.
सरदार कोयाजी बांदल:-अक्षय वाघमारे यांनी ही भूमिका साकारली आहे स्क्रिन टाइम कमी पण छाप सोडणारे सरदार.
सरदार बाजी सर्जेराव जेधे:- स्वतः दिग्दर्शकांनी ही भूमिका साकारली आहे. महाराजांवर प्रेम आणि शत्रुचा तिरस्कार या दोन्ही छटा त्यांनी उत्तमरित्या साकारल्या आहेत.
केशर (फुलवंती):-मृणमयी देशपांडे यांनी ही भूमिका साकारली आहे बहिर्जी नाईकांची साथीदार म्हणुन उत्तम रित्या भुमिका बजावली आहे.
शाहिस्तेखान:- अनुप सोनी यांनी या भूमिकेत कपटीपणा,अविश्वास,माज, भित्रट स्वभाव व्यवस्थितपणे हाताळला आहे.
नामदार खान:- समीर धर्माधिकारी या भूमिकेसाठी योग्य निवड ठरली, नवाबाप्रति श्रद्धा व मराठ्यांबद्दल प्रचंड चिड त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे.
राय बागन सायेबा:- तृप्ती तोरडमलमध्ये तोच राग आणि शाहिस्तेखानावरची चिड एकदम नैसर्गिक वाटते अशी भुमिका त्यांनी साकारली आहे .
सरदार चिमणाजी देशपांडे:- महाराजांच्या व लाल महाला जवळील मवाळ पण प्रसंगी जहाल आणि स्वराज्यासाठी जीव देण्यास व घेण्यास तयार.
असा हा ऐतिहासिक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला झी टॉकीज वर उद्या 16 ऑगस्ट ला दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता येणार आहे.