सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून शनिवारी एकाच दिवशी सर्वाधिक 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधीत रूग्णांची सहाशेच्या जवळ पोचली आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या 598 आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात झपाट्याने कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत शनिवारी आणखी 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये वैभववाडी 1, देवगड तालुक्यातील नाडन 1, देवगड 2, शिरगाव 1,मिठबाव 1,कणकवली तालुक्यातील फोंडाघाट 2,सांगवे 1,खारेपाटण 3,कासारडे 1,कणकवली पटकीदेवी 1,मालवण तालुक्यातील देऊळवाडा 1,गवंडीवाडा 1,तळगाव 2, कुडाळ तालुक्यातील पणदूर 1,ओरोस 1,अणाव 1,पिंगुळी 1,सांगिरडेवाडी 1,कुडाळ शिवाजीनगर 1, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल 1,सावंतवाडी 2,सोनूर्ली 2,माठेवाडा, 1असे 30 रुग्ण नव्याने आढळले आहेत.
यातील 8 रुग्ण हे रॅपीड टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले आहेत तसेच शनिवारी आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 411 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर सद्यस्थितीत 176 सक्रीय रुग्ण राहिले आहेत. एकूण कोरोनाबाधित संख्या 598 झाली आहे.