सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 93 रुग्ण आढळून आले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे. गेली दोन दिवस झाले शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सहा हजाराच्या घरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या गेली आहे. तर आतापर्यंत 391 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
सोलापूर शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 898 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 441 तर महिला 2 हजार 457 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार चार जणांचा मृत्यू झालाय. पडगाजी नगर अक्कलकोट रोड परिसरातील 49 वर्षाची महिला, आसरा चौक परिसरातील 70 वर्षाचे पुरूष, खडल गल्ली बाळे परिसरातील 45 वर्षाचे पुरूष, महेश नगर सम्राट चौक परिसरातील 77 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 391 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 261 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 1 हजार 490 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 397 अहवाल निगेटिव्ह तर 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 48 हजार 326 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 42 हजार 303 निगेटीव्ह तर 5 हजार 898 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 3 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 504 आहे.