सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज देण्यात आलेल्या ग्रामीण भागाच्या अहवालामध्ये 314 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा दुर्दैवी झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 704 एवढी झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज कोरोनामुळे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील 60 वर्षीय पुरुष, उघडेवाडी येथील 55 वर्षाची महिला, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 69 वर्षीय महिला, मोडनिंब (ता. माढा) येथील 80 वर्षीय पुरुष, करमाळ्याच्या सुतार गल्लीतील 74 वर्षाचे पुरुष, लव्हे येथील 65 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 69 वर्षाचे पुरुष तर रामपूर (ता.दक्षिण सोलापूर) येथील 13 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज पंढरपूर तालुक्यात 84 तर बार्शी तालुक्यात 70 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
थोडक्यात सोलापूर ग्रामीणमध्ये आजच्या अहवालानुसार आज आठ मृत्यू तर नव्याने 314 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या अहवालानुसार 231 जणांनी मात केली आहे. आज 314 ची भर पडल्याने एकूण बाधित 7 हजार 704 झाली आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू 213 तर कोरोनामुक्त 4 हजार 511 झाले आहेत. पंढरपूर आणि बार्शीमध्ये सर्वाधिक अनुक्रमे 1 हजार 734, 1 हजार 570 अशी आहे.