उस्मानाबाद / सोलापूर : विधानसभा निवडणूकीच्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा तरुण अजिंक्य टेकाळे हा उस्मानाबाद येथील जेलमधून फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील विधानसभा निवडणुका वेळी कळंब तालुक्यातील पाडोळी येथे अजिंक्य टेकाळे या तरुणाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. टेकाळे या तरुणावर गुन्हा दाखल होवून त्याची रवानगी धाराशिव येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान आज वैद्यकीय तपासणीसाठी त्यास नेत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
१६ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी पाडोळी येथे आले होते. तेव्हा अजिंक्य टेकाळे याने त्यांच्या हात-हातात घेत त्यांच्या पोटावर चाकूने वार केला होता. तेवढ्यात ओमराजे निंबाळकर यांनी पोटावर हात ठेऊन तो वार हातावर घेतला. त्यामुळे हातावर असलेल्या घड्याळावर चाकू लागला व ओमराजे बाल-बाल बचावले होते. त्यानंतर शिराढोन पोलिसांकडून या हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. व या हल्लेखोरावर भांदवी 307 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो जेलमध्येच होता.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारगृह उभारण्यात आले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथून जिल्हा सामान्य रुग्णालयातून तात्पुरत्या जेलमध्ये परत आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला आहे. पोलिसांनी आता त्याचा शोध घेणे सुरू केलं आहे.