न्यू जर्सी : ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित जसराज यांचे कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कुटुंबासोबत अमेरिकेतच होते. त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या 80 वर्षांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सन्मान मिळवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील प्रसिद्ध आणि शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते शास्त्रीय संगीताच्या मेवती घराण्याशी संबंधित होते. वडील पंडित मोतीराम यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण पंडित जसराज यांना दिले. नंतर त्यांच्या भावाने त्यांना तबला संगीतकार म्हणून प्रशिक्षण दिले.
पंडित जसराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले. वयाच्या 22 व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिली रंगलेली मैफिल सादर केली. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
28 जानेवारी 1930 ला हरियाणाच्या हिसार येथे जन्मलेले पंडित जसराज हे मागील 4 पिढ्यांची परंपरा पुढे चालवत होते. त्यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे संगीतज्ञ होते. हरियाणाच्या हिसारचे रहिवासी असलेल्या जसराज यांचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची मुलगी मधुरा शांतारामशी लग्न केले. 1960 मध्ये त्यांची मुंबईत मधुराची भेट झाली होती.
पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं आहे. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले.