काठमांडू : नेपाळमध्ये सध्या एका कासवाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे. हे कासव इतर कासवांपेक्षा वेगळंच आहे. या कासवाचा रंग सोनेरी आहे. हे कासव विष्णू देवाचा अवतार असल्याच्या श्रद्धेतून लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
सोनेरी कासव आढळल्यानंतर वन्यजीव तज्ञ कमल देवकोटा यांनी सांगितले की या कासवाला नेपाळमध्ये विशेष सांस्कृतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यांनी सांगितले की, हे कासव विष्णू देवाचा अवतार आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यांनी कासवरुपात अवतार घेतला आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कासवाच्या कवचाच्या वरील भागाला आकाश आणि खालील भागास पृथ्वी समजले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टने हे कासव भारतीय फ्लॅप कासव वर्गातील असल्याचे म्हटले आहे. हे कासव धनुष जिल्ह्यातील धनुषधाम नगरपालिका भागात आढळले आहे. या कासवाच्या दर्शनासाठी लोकांची रांग लागली आहे. नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. सगळ्या जगात अशाप्रकारचे फक्त पाच कासव आहेत. आमच्यासाठी हा महत्वाचा शोध असल्याचे देवकोटा यांनी सांगितले.
* जनुकीय बदल झाल्याने कासवाचा रंग सोनेरी
तज्ञांच्या माहितीनुसार, कासवांच्या जनुकीय बदलामुळे कासवाचा रंग सोनेरी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला क्रॉमेटिक ल्यूसिझम म्हणतात. त्यामुळे कासवाच्या कवचाचा भाग हा सोनेरी होतो. त्यामुळे त्वचेचा रंग हा सफेद अथवा मध्यम सफेद रंगाचा होऊ शकतो. कासवात जनुकीय बदल झाल्याने त्याचा रंग सोनेरी झाला आहे. सध्या नेपाळ या कासवाची चर्चा असून वन्यजीव अभ्यासकांकडून या कासवाचे निरीक्षण, अभ्यास सुरू आहे.