सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभाग आणि पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्यावतीने उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन प्रवाहाबद्दल ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नईचे कुलगुरू डॉ. संदीप संचेती यांच्या हस्ते होणार आहे. ते यावेळी अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन प्रवाह बद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या राष्ट्रीय चर्चासत्रात प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचा सहभाग राहणार आहे. डॉ. एस. डी. राऊत, प्रा. सी. जी. गार्डी हे चर्चासत्राचे नियोजन करीत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन प्रवाहाबद्दल होणाऱ्या चर्चासत्रात अभियांत्रिकीचे विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी सहभागी, व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.