नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आदरांजली अर्पण केली आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला होता. ते 1984 ते 1989 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान आणि राजीव यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. राजीव गांधी यांनी आयटी क्षेत्राबाबत घेतलेले निर्णय नेहमीच स्मरणात राहतील असेही नायडू यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
माझे वडील एक दयाळू आणि प्रेमळ माणूस होते. माझे ते वडील होते याबद्दल स्वत:ला मी भाग्यवान समजतो. मला त्यांचा अभिमानही आहे. मला त्यांची आजच नव्हे तर रोजच आठवण येते असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्यासोबत युवक कॉंग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी राजीव गांधी यांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.