मुंबई : अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाता तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला असून ते मुंबईत दाखल झाले आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा व्हॉट्सअॅप चॅट समोर आला आहे. सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅप मेसेज केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
8 जून रोजी रियाने महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅप केला होता. या चॅटिंगमध्ये रियाने मूव्ह ऑन झाल्याचं लिहिलं आहे. ती पुढे लिहिते की, जड अंतकरणाने मी पुढे जात आहे. रियाने पहिला मेसेज आयशा मूव्ह ऑन असा केला आहे. रियाच्या मेसेजवर महेश भट्ट यांनी तुझे वडील या निर्णयाने खूश होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय महेश भट्ट यांनी पुढे लिहिलं की,आता मागे वळून पाहू नकोस. जिलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्तीच्या भूमिकेचं नाव आयशा आहे.
आज तक यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
* सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल
दुसरीकडे सुशांत प्रकरणाने वेग घेतला आहे. सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सीबीआयने यासाठी एका एसआयटीचं गठन केलं आहे. एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि एडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करतील.