सोलापूर : सोलापूर शहरात शुक्रवारी 37 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. आज रेल्वे लाईन्स परिसरातील 72 वर्षाच्या महिलेचा यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला. एकूण बळीची संख्या 396 झाली आहे. तर कोरोना बाधिताची संख्या 6 हजार 225 झाली आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 225 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 636 तर 2 हजार 589 महिला रूग्णांचा समावेश आहे. आज यशोधरा हॉस्पिटल मधिल 71 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरांमध्ये 396 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 265 तर महिला 131 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 1 हजार 566 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 529 अहवाल निगेटिव्ह तर 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 54 हजार 858 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 48 हजार 633 अहवाल आले तर पॉझिटीव्ह 6 हजार 225 आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 169 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 660 आहे. तर आज 38 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये पुरूष 22 महिला 16 रूग्णांचा समावेश आहे.