सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा 285 रुग्णांची भर पडली आहे. आता ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 946 झाली आहे. तर शुक्रवारी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 250 झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील इंडियन अॉईल कंपनीत तब्बल 18 पूरुष बाधित आढळले आहेत. या अॉईल कंपनीत आसपास ग्रामीण भागासह शहरातील कामगार असल्याने तेथे भीती वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनावर अद्यापही दोन हजार 866 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाच हजार 830 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे. अद्यापही 144 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यात ग्रामीण भागात मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्यातील खामगाव येथील 75 वर्षीय पुरुष, कांदलगाव येथील 80 वर्षीय महिला, नारी येथील 60 वर्षीय पुरुष, बार्शी शहरातील आलीपुर रोड भागातील 50 वर्षीय महिला, सांगोला तालुक्यताील नाझरे येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवेढा शहरातील मित्र नगर भागातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सोलापूर शहरातील रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत 8 हजार 946 जण कोरेाना बाधित आढळून आले आहेत.
* कोरोनाग्रस्तांचा 15 हजाराचा आकडा पार
शुक्रवार अखेर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 25 हजार 255 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 25 हजार 111 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 9 हजार 941 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 15 हजार 171 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागातील आणखी 144 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.