सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारच्या अहवालानुसार कोरोनाग्रस्तापेक्षा कोरोनावर मत करणार्या रूग्णांची संख्या अधिक आहे. आज 26 कोरोनाग्रस्तांची भर पडली तर 40 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 26 पुरूष आणि 14 महिला रूग्णांचा समावेश आहे. मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये उपाचार घेणार्या एक महिला आणि पुरूषाचा आज बळी गेला आहे. आतापर्यंत 399 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाबळीची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 309 झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 681 तर 2 हजार 628 महिला रूग्णांचा समावेश आहे. शनिवारी मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रेल्वे लाईन परिसरातील 80 वर्षांची महिला, जुळे सोलापुरातील 72 वर्षाच्या पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरांमध्ये 399 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 267 तर महिला 132 रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 404 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 377 अहवाल निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 56 हजार 378 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 50 हजार 69 अहवाल आहेत. पॉझि